अस्तिव अॅपलचे स्टीव्ह जॉब्सनंतरचे
![]() |
| स्टीव्ह पॉल जॉब्स |
स्टीव्ह जॉब्सकडे एक प्रकारची दैवी दृष्टी होती, वास्तव्याचा विपर्यास करून एखादी गोष्ट सत्यात मांडण्याची;त्याच्या प्रत्येक निर्णयात ही गोष्ट दिसून येते मग अगदी अॅपलच्या लोगो मधलं अर्धे सफरचंद असो किंवा अॅपलच्या कोणत्याही लॉंच इव्हेंट मधलं वेगळेपण.स्टीव्हने कंपनीच वेगळेपण निर्माण केलं आणि ते जपलं सुद्धा.आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही स्टीव्ह कंपनीसाठी झटत राहिला.आपला मृत्यू जवळ आला आहे हे माहित असूनही स्टीव्ह कंपनीत एका वर्षापेक्षा जास्तवेळ राहिला.
स्टीव्हचे काही निर्णय वादग्रस्त नक्कीच ठरले पण तरीही ते योग्यच होते.आज अॅपल ज्या उंचीवर आहे त्यासाठी स्टीव्ह आयुष्यभर झटला त्याच्याकडे अशी काही स्वभाववैशिष्ट होती ज्यांच्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरला.स्टीव्हने आपल्या अख्या कारकिर्दीत लोकांना स्वप्न कशी जगावे हे तर दाखवलेच पण त्याचबरोबर कलात्मकता आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम त्याने साधला होता.आज जॉब्स नंतर टीम कूकअॅपलचा सीइओ आहे पण स्टीव्हच अॅपलमधील स्थान अबाधित आहे.टीम कूकनेच अलीकडे झालेल्या मुलाखतीत सांगितलं की स्टीव्हसारख्या व्यक्तीखाली काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.आजही असा एकही दिवस जात नाही की स्टीव्हची आठवण येत नाही.आजही चौथ्या मजल्यावरील स्टीव्हची केबिन आहे तशीच आहे.
आज स्टीव्ह जाऊन तीन वर्ष होत आहेत स्टीव्हच्या जाण्यानंतर अॅपलमध्ये अनेक बदल झाले त्यातल्या काही घटनांनी स्टीव्हच्या विचारांना बाजूला सारंल तर काही घटनांनी स्टीव्हचं स्थान अधोरेखित केलं.अशाच काही घटनांचा आढावा येथे मी घेतला आहे.
जॉब्स VS कूक
टीम कूकला सर्वात मोठं आव्हान सीईओ झाल्यावर होतं ते म्हणजे स्टीव्हच्या दर्ज्याच काम कसं करायचं.गेल्या वर्षभरात अॅपलच्या शेअर्सच्या बाजारमूल्यात वाढ झाली आहे.ह्याचं श्रेय टीम कूकला दिलं जातं.पण असं असलं तरी स्टीव्हच्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करण टीम कूकला जमलं नाही त्याची काम करण्याची निराळी पद्धत आहे.स्टीव्हच्या कार्यपद्धतीचा आभास टीम कूकमध्ये होतो पण असं असलं तरीही स्टीव्हला शतकातील एक सर्वोत्तम सीईओ मानलं जातं.स्टीव्हचा आभास टीम कूकच्या वागण्यात आत्ताच्या आयफोन ६ लॉंचच्या वेळी दिसून आला.टीम कूकच्या सादरीकरणामध्ये
स्टीव्हची झलक दिसून आली.’वी हॅव अनअदर प्रोडक्ट फॉर यु’ हे वाक्य स्टीव्हचच ज्याचा टीम कूकने अनेकदा वापर केला आहे.

प्रसिद्धी :-
प्रसारमाध्यमांना फक्त कार्यक्रमांच आमंत्रण दिलं जायचं त्या इव्हेंटमध्ये काय विशेष आहे त्यातील महत्त्वाच्या गोष्टी ह्याची माहिती कोणालाही दिली जायची नाही पण ही परंपरा यंदा खंडित झाली आयफोन ६ लॉंचची माहिती मिडियामध्ये लिक झाली ज्यामुळे अनेकांना इव्हेंटबद्दल आधीच माहिती झालेली होती.आपली माहिती गुप्त ठेवण्यात स्टीव्हचा हातखंडा होता पण अॅपलला त्यात अपयश आलं.
इतर कंपन्यांशी स्पर्धा :-
स्टीव्ह जॉब्सने कधीही अॅन्ड्रॉइड किंवा विंडोजला आपला प्रतिस्पर्धी मानलं नाही वेळोवेळी आपल्या मुलाखतीतून तो त्यांना तुच्छ लेखत असे पण सध्या अॅपलच्या तत्वांमध्ये बदल होताना दिसत आहे. अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी त्यांनी आयफोनच्या आकारामध्ये बदल केला त्याच बरोबर नव्याने मार्केटमध्ये आणलेलं अॅन्ड्रॉइड वॉच हा देखील त्याचाच एक भाग.स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अॅपलने हे बदल केल्याचं अनेकांच म्हणणं आहे.

शेअरहोल्डर्सची समस्या:-
स्टीव्हच्या मृत्यूनंतर अजून एक बदल अॅपलमध्ये पाहायला मिळाला तो म्हणजे शेअर होल्डर्स आणि गुंतवणूकदारांच्या भूमिकेतला बदल.गेल्या वर्ष दीड वर्षाच्या काळात अॅपलच्या बाजारमुल्यात सतत चढ-उतार होताना दिसून आले.ह्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले हीच परिस्थिती स्टीव्ह असताना समजा आली असती तर त्याने ती शिताफीने हाताळली गुंतवणूकदारांना कंपनीविषयी एक प्रकारचा विश्वास होता जो स्टीव्हने मिळवला होता.बाजारमुल्यातील चढ उताराचा सुदैवाने कंपनीला फटका बसला नाही कारण कंपनीचा विस्तार जगभरात झालेला आहे.
जाहिरातीतील विविधता :-
अॅपलच्या पहिल्या प्रोडक्ट पासून स्टीव्हने जाहिरातीमध्ये विविधता राखली होती.आपल्या प्रोडक्टच ब्रँडिंग करण्यात स्टीव्ह पटाईत होता.कलात्मक आणि हटके जाहिरातीत त्याचा हात धरणार कोणीच नव्हतं.स्टीव्हच्या मृत्यूनंतर ह्याबाबतीत अॅपल मागे पडले आहेत.हल्लीच्या जाहिराती केवळ व्यावसायिक अंगाने केल्या जात असल्याचं दिसून येत.
प्रोडक्ट्सचे अपयश :-
स्टीव्हच्या कारकिर्दीत फारच क़्वचित झालेली गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रोडक्टच अपयश.प्रत्येक नेत्याला कमी अधिक प्रमाणात अपयशाचा सामना करावाच लागतो स्टीव्हला ही तो करावा लागलाच पण त्याने त्या अपयशावर उपाय देऊन योग्य प्रकारे मात केली.त्याच्या नसण्याने ह्या बाबतीत अॅपलला नुकसान होत आहे.आयओएस ७ म्हणावी तशी यशस्वी ठरू शकली नाही अनेक युसर्सनी त्या ओएसला नाकरल.त्यानंतर अॅपल मॅप्सचा देखील प्रयत्न सपशेल फसला आणि ग्राहकांनी गुगल मॅप्स वापरावेत अस टीम कूकला जाहीरपणे सांगावं लागलं जे कधीही स्टीव्हने केलं नसतं.नुकत्याच मार्केटमध्ये आलेल्या आयफोन ६ प्लसच्या बाबतीतही तोच प्रकार घडत आहे कंपनीकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण ह्याबाबतीत देण्यात आलेलं नाही.बेंडीग आयफोनवर सध्या प्रचंड टीका आणि विनोद होताना दिसत आहेत.
नवीन प्रोडक्ट निर्मितीमध्ये अपयश :-
स्टीव्ह जॉब्स नवनिर्मितीचा बादशहा मानला जायचा पण त्याच्या मृत्युनंतर कंपनीकडून नवीन कोणत्याही प्रोडक्टची निर्मिती केली गेली नाही कंपनीचा भर हा केवळ प्रोडक्ट्सच्या अपडेटेड वर्जनसवरच होता.
स्टीव्ह जॉब्सची इतर कोणत्याही व्यक्तीशी तुलना करणे तस पाहायला गेलं तर चुकीचं आहे त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होत.एक नजर होती त्याच्या ह्या सर्व गुणांनीच तो आदर्श सीईओ मानला जातो. अॅपलमधील त्याचे स्थान आजही अबाधित आहे.त्याच्यानंतर टिम कूक आज यशस्वीपणे कंपनी सांभाळत आहे.आज कंपनीचा भारतात विस्तार करण्यात टीमला यश आलेले आहेच त्याचबरोबर अॅपलचा बिझनेस वाढवण्यात त्याला यश आलेलं आहे स्टीव्हची पोकळी भरून काढण खरच कठीण आहे पण त्याच्या विचारांची आज टीमला साथ आहे ज्याद्वारे अॅपल नवनवीन उड्डाणांसाठी सज्ज आहे

Comments
Post a Comment