संगीतक्षेत्राला तंत्रज्ञानाचे वेध

सध्याचा काळ संगीतक्षेत्रासाठी भरारीचा काळ मानला जातो.अनेक नवनवीन प्रयोग हल्ली संगीतक्षेत्रात होताना दिसत आहेत.अनेक नवीन संगीकारांचा उगम होताना दिसत आहे.हल्ली रेकॉर्डीगचे नवीन तंत्र विकसित होत आहे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संगीतामध्ये प्रयोग केले जात आहेत.ह्या नवनवीन प्रयोगांना रसिक प्रेक्षकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभताना दिसत आहे.म्युजिक प्रोग्रामिंग,मोबाईल रेकोर्डिंग टेक्निक,ऑडिओ व्हिज्युअल तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे संगीतक्षेत्राला भरभराट येत आहे पण असं असलं तरीही हे तंत्रज्ञान संगीत क्षेत्राला मारक आहे की पूरक याविषयी अनेक मतभेद आढळून येतात.याच टेक्नोट्रेंडचा येत्या रविवारी असलेल्या वर्ल्ड म्युजिक डे च्या निमित्ताने घेतलेला आढावा
आज म्युजिक प्रोग्रामिंगचा वापर करून केवळ मिडी कीबोर्ड आणि कॉम्प्युटर याच्या मदतीने एखाद्या गाण्याला संगीत देता येणे शक्य आहे.वेगवेगळे प्रयोग यामुळे करता येतात.आज बहुतांश संगीतकार प्रोग्रामिंगचा वापर आपल्या चालीसाठी करतात.वेगवेगळे इफेक्ट्स वापरून गाण्याचा पूर्ण आयाम प्रोग्रामिंगमुळे बदलून टाकता येतो पण असं असलं तरीही गाण्यात लाइव्ह वाद्यांचा वापर कमी झाल्यामुळे त्यातला लाइव्हनेस कमी झाल्याची टीका अनेक ज्येष्ठ मंडळी करताना दिसून येतात.लॉजिक,क्युबेस यांसारख्या सॉफ्टवेअर्सचा वापर करून आज लगेच संगीत दिलं जातं.पण यामध्ये गुणवत्ता राखली जाते का हे मात्र न सुटणारे कोडेच आहे.अनेक चांगले संगीतकार जरी तंत्रज्ञानाचा वापर चांगला करत असले तरीही त्यावर एक मर्यादा असण्याची गरज आहे अन्यथा त्या गाण्यातील मजा निघून जाऊ शकते.आज मोबाईल रेकोर्डिंग टेक्निक,ऑडिओ व्हिज्युअल तंत्रज्ञानाचा,ऑनलाईन लिरिक्स वेबसाईट यांसारख्या गोष्टींमुळे कलाकारांना फायदा होत आहे.

कलाकाराने भान राखणे गरजेचे 
आज तंत्रज्ञानाच्या आगमनाने संगीत देणे सोपे झाले असले तरीही त्याचा अतिवापर करणे चुकीचे आहे.आज आधुनिक रेकोर्डिंग तंत्रामुळे गायकाचा आवाज बेसूर जरी असेल तरी तो सुरात आणता येतो.या फायद्यामुळे आज अनेक गायक कमी तयारीनिशी रेकोर्डिंगकडे वळत आहेत याने त्यांचेच नुकसान होते आहे त्यामुळे कलाकारांनीच तंत्रज्ञानाच्या किती आहारी जावे याचा विचार केला पाहिजे कारण फायद्याप्रमाणे तंत्रज्ञानाचेतोटेसुद्धा आहेत

(क्रमशः)

Comments